सणवार आणि माझ्या आठवणी..“मी मंदा. सध्या व्ही-गोल्डन एज् या मेडिकेअर सेंटरमध्ये आरोग्याच्या काही कारणाने राहतेय.
इथेही फार सुंदर पद्धतीने सण साजरे केले जातात. त्या प्रत्येक वेळी घरी साजरा केलेल्या सणाची आवर्जून आठवण येते..”
 

सण हा प्रत्येकाच्या घरी विशेष असतो. भारतीय सण हे नेहमीच आरोग्यदायी विचारांचे संस्कार करणारे आहेत. मी आयुर्वेदिक क्षेत्रात जवळपास वीस वर्ष काम केलं. आता वयाच्या ६०व्या वर्षी मात्र अनेक गुंतागुंतींच्या व्याधी मागे लागल्या आहेत. मला अजूनही माझ्या कामाचा पहिला दिवस आठवतो. वैद्य नितीन यांनी खूप गोष्टी आपुलकीने समजावून सांगितल्या. काम कसं असेल, मला नेमकं काय करायचंय. इत्यादी. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले आजार सांगायची तेव्हा आपल्यावर खूप दडपण आल्यासारखं वाटायचं. आता फार काही वाटत नाही. पण जेव्हा आपण स्वतः अनेक आजारांमुळे त्रस्त असता तेव्हा मात्र कुठला सण आणि कुठला आनंद असं वाटतं. ज्या दिवशी जरा स्वास्थ्य बरं असेल तो आपल्यासाठी सण..

गोपाळकाला, दसरा, दिवाळी असे अनेक सण खाद्यपदार्थ आणि अनेक रिवाजांनी परिपूर्ण आहेत. कधी दही दूध भाज्या, तर कधी मिष्टान्न, दिवाळीत मला आठवतं ते करंज्या आणि चकल्या करण्याचा घाट.. हो ना, आमच्या घरी सगळ्यांना मी केलेला फराळ फार आवडायचा. त्या वर्षी असाच फराळ करत होते. रात्रीचे वाजले असतील १० किंवा साडेदहा!

माझा नवरा प्रसाद हॉलमधून मला आवाज देत माझी वाट न पाहता आत आला. “अगं मंदा ऐकतेस.. अगंं ए.. कुठेस.. काय सुंदर वास येतोय.. पण मी म्हणतो एवढ्या रात्री हे सगळं केलंच पाहिजे का..?” खाली नुकत्याच करंज्या तळून तेलाची कढई जमिनीवर ठेवली होती तिथे येताच एकदम किंचाळले, “अगं आई गं..” त्या दिवशी जे झालं ते निस्तरताना माझी पुरती धांदल उडाली. उकळतं तेल व्यवस्थित लक्ष देऊन न चालल्याने सगळं पायावर सांडलं. मी त्याच्या आवाजात आवाज मिसळत.., “अरे काय हे. लक्ष कुठे होतं तुझं..? केवढं भाजलंय रे..” आमच्या घरातला हा आरडाओरडा ऐकून शेजारचे धावत आले. त्यांनी दरवाजा वाजवल्याने मी दाराकडे आले. त्या आधी प्रसादला सोफ्यावर बसवलं होतं.

शेजारच्या मिलिंदच्या आईने पटकन राकेशला गाडी काढायला सांगितली. डॉक्टरकडे धावाधाव. तिथे पोहचल्यावर लक्षात आलं की, पायावर उकळतं तेल पडल्याने प्रसाद कळवळून जमिनीवर पडला तेव्हा बाजूला असलेल्या टेबलाने किंवा जमिनीवर पडल्याने कंबरेला चांगला मार बसला होता. बहुदा फॅक्चर होतं. एक्सरे काढल्यावर डॉक्टरांनी सांगितलं. मार चांगलाच लागला आहे. ओळखीचे होते म्हणून ठिक. त्यांनी सांगितलं की, आता कंबरेला फॅक्चर असल्याने पुढचे एक - दोन महिने आराम करावा लागणार..त्या आजारपणात तब्येत खूप खंगली. ऑफिस घर आणि आई-बाबांना सांभाळत मी थकले. पण प्रसाद आजारपणातच अॅटॅक येऊन निघून गेला. आता आई-बाब आणि मी घरात राहिलो. ऐन पन्नाशीत नवरा गेला. आई आणि बाबांनी फार समजून घेतलं. पुढे दोन वर्षात दोघेही मागोमाग गेले. मी मागे राहिले. घरातले सगळे जाताना माझ्या आयुष्यात उरला तो प्रत्येक सणाच्या दिवशीच्या आठवणी. काही सुखद तर काही मनाला असह्य वेदना देणाऱ्या..!

'वी-गोल्डन एज्' देत असलेली सेवा ही काळाजी गरज आहे, हे त्यांचे शब्द आमच्यासाठी मोलाचे आहेत. 'वी-गोल्डन एज्'च्या रेसिडंट्सचे मित्र वसंत टोळ यांचा अनुभव नक्की जाणून घ्या.

मागच्या महिन्यात मी पुणे पहायला इंदौरवरून पुण्यात आले आणि एका दुचाकीची धडक लागून पायाचं दुखणं मागे लागलं. एक दोन नाही तर तीन वेळा ऑपरेशन करावं लागलं. मैत्रिणीच्या घरचेतरी किती दिवस हे दुखणं काढणार.. ती आपली शाळेतली मैत्रिण म्हणून ट्रीपला आले. पण एवढा त्रास होईल असा कधी विचारदेखील केला नव्हता. परवा सहज फेसबुकवर काहीतरी वाचताना एक पोस्ट दिसली आणि मला पुन्हा एक आशेचा किरण दिसला.

वी-गोल्डन एज् म्हणून एका संस्थेची ती पोस्ट होती. वैद्यकीय मदत आणि २४ तास नर्स सोबत असेल तर ऑपरेशन झालेल्या माझ्यासारख्या प्रत्येकाची काळजी घेणारं हे वेगळंच घर आहे. इथे काम करणारे किती एनर्जीने काम करतात ते बघून मला माझे दिवस आठवतात.

दोन महिने मी आता इथे आहे. घरासारखी स्वच्छता, तसंच जेवण आणि गप्पा मारायला सोबती. आता तब्येत सुधारते आहे. दर आठवड्याला फिजिओथेरपीस्ट येऊन प्रोग्रेस चेक करतात. गरजेचे व्यायाम आणि काही उपचार करतात. डॉक्टर तर रोज येतात. नर्स २४ तास सोबत असतात.

घरी कोणाला असं आजारी माणसाचं करायला सांगायचं तरी कंटाळा करतील. पण इथे फार चांगली काळजी घेतली जातेय. आणखी काही दिवसांनी मी घरी जाईन. पण इथे घेतलेली काळजी कायम आठवत राहील. सोबत इतक्या वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले लोक आहेत. वेगवेगळ्या वयाचे.. जगण्याची पद्धत बदलतेय तशी आपल्या गरजेच्या अनेक गोष्टी फार सुकरपणे उपलब्ध होत आहेत. नवलंच आहे सगळ्याचं..!

- मंदा कारखानीस