आरोग्य मित्रांबद्दल.. 

आपलं सगळ्यांचे वय हे खूप वेगळे आणि सुंदर अनुभव देणारे आहे. मग कोणी विशीतले असो चाळीशीतले किंवा कोणी साठी-सत्तरीचे आजोबा. सुख, समृद्धी, आनंद, महत्त्वाकांक्षा आणि खूप वेगळ्या भावना आपण रोज अनुभवत असतो.
 

फक्त आपण अनुभवत असलेले अनुभव हे वेगवेगळ्या ठिकाणचे असतात. काही जण त्यांंच्या स्वतःच्या घरी, कोणी भाड्याने राहत असलेल्या घरात तर कोणी हॉस्टेल किंवा इतर नातेवाईकांकडे राहतात. सण, उत्सव या निमित्ताने सगळे एकत्र जमून आनंदाने जल्लोश करतात. तसेच दुःखाच्या प्रसंगात, अडी-अडचणीत एकत्र येऊन दुःख, वेदना कमी करण्याचा प्रयत्नही घरोघरी नातेवाईक, जिवलग यांच्या साथीने केला जातो. शहर असो वा गाव घरोघरचे करते, कमावते दूर कुठे राहत असतात. अशा वेळी घरी असलेल्या वयस्कर माणसांना, कामावर असणाऱ्या मुलांना, सुनांना, मुलींना किंवा जावयांवर काहीही प्रसंग ओढवला तर सर्वांची फार धावपळ होते.

 

त्यातूनही दवाखाने, हॉस्पिटल यांच्याशी संबंधित काही प्रसंग घडले तर सर्वांची दैनंदिन कामे बाजूला ठेवून आपल्या माणसांच्या मदतीला जावे लागते. अशावेळी मित्र, नातेवाईक यांच्या हॉस्पिटलच्या पाळ्या लावणे आणि नंतर घरी आल्यावर त्यांची काळजी कशी घ्यायची यावर मिळालेल्या सूचनांचे स्वागत करायचे असे साधारण आजारी माणसाच्या घरच्यांची परिस्थिती असते. पण खरंतर त्यांची काळजी घेताना कशा पद्धतीने घ्यावी याबद्दल तेवढी योग्य माहिती आपल्याला नसते. यातूनच फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या-औषधे देणे इतकीच काळजी आपण घेतो. पण त्यातही कधीतरी घरच्या माणसांची फार तारांबळ उडते. त्यातून आजारी माणसाला भेटायला अनेक ओळखीचे येतात, यामुळेही त्यांना आराम असा मिळतच नाही.

 

मग नेमकं यावर इतर काही पर्याय उपलब्ध आहे का? याचा विचार प्रत्येकाने केला तर त्यादृष्टीने शोध घेणे शक्य आहे. आता आरोग्याच्या सुविधा पुरवताना खूप वेगळा विचार करून मेडिकेअर होम किंवा हेल्थकेअर सेंटर उभे राहत आहे. ही कल्पना परदेशात जितकी रुजली तितकीच ती भारतात नवीन आहे.

 

भारताच्या दृष्टीने विचार केला तर वेगाने विकसित होणाऱ्या शहरांत पुणे शहराचा समावेश होतो. आता शहराच्या सर्व भागात मोठमोठी हॉस्पिटल्स उभी राहत आहेत. कोणतेही हॉस्पिटल जितके सुसज्ज तितकाच रुग्णावर होणारा खर्च अधिक असतो. काही रुग्णांना दोन महिन्यांहून अधिक काळासाठी विशेष काळजी आणि चोवीस तास नर्सिंग केअर व डॉक्टरांच्या सल्ल्याची किंवा तज्ज्ञांच्या निगराणीची गरज असते. पण घरी चोवीस तास एखादी व्यक्ती रुग्णाची काळजी घेण्यासाठी राहणार म्हणजे त्यांच्या सोबत घरातल्या कोणीतरी व्यक्तीने राहणे गरजेचेच असते.

 

यावर एक फार वेगळा विचार करून वी-गोल्डन एज् हे हेल्थ आणि मेडिकेअर सेंटर पुण्यात सुरू आहे. इथे अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यात मुख्यत्वे सर्व वयाच्या व्यक्ती आणि अनेक आजारी व्यक्तींची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, केअर टेकर्स २४ तास उपलब्ध असतात. आपल्या नातेवाईक, मित्रांना इथे रेसिडंट म्हणून अॅडमिट करता येते. यामध्येही काही महिने किंवा आजीवन अशा पद्धतीने रेसिडंट होता येते.

 

परदेशात रुजलेली स्टेप-डाऊन केअर, पॅलिएटिव केअर आणि पोस्ट-ऑपरेटिव केअर अशा महत्त्वाच्या विषयांवर काम करणारी ‘वी-गोल्डन एज् हे हेल्थ आणि मेडिकेअर’ ही संस्था नव्या काळातील आरोग्य मित्र म्हणून आपली ओळख टिकवून आहे. आरोग्यदायी वातावरण, सकस अन्न, वेळेवर वैद्यकीय मदत, इमर्जन्सीच्या काळात अॅम्ब्युलन्सची सुविधा अशा अनेक सुविधा आहेत. इथे प्रत्येक रुग्णासाठी फिजिओथेरपी आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी सल्ला देणारे तज्ज्ञ वेळोवेळी मदतीला आहेत.

 

आपल्या आजारी मित्र, नातेवाईकांना अशा मदतीची गरज असेल तर ‘वी-गोल्डन एज्’ची माहिती त्यांना नक्की द्या.